…अखेर चुकलेली 2 वर्षांची मुलगी व आजी घरी पोहोचली!

कोथरुड पोलिसांनी फेसबुकचा वापर करून शोधला घराचा पत्ता

कोथरुड – नातवाच्या दोन वर्षाच्या मुलीला फिरवून आणण्यासाठी दुपारी आजी घराबाहेर पडली. मात्र, घरी परत जाण्यासाठी रस्ताच न सापडल्याने त्या भरकटल्या व घराच्या शोधात त्या सेनापती बापट रस्त्यावरील हनुमाननगरवरून कोथरुडमधील किष्किंधानगर परिसरात पोहचल्या. घाबरलेल्या आजीचा चेहरा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने ओळखला व त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आजी व लहान मुलगी चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करत नातवाचा नंबर मिळवला व रात्री आठ वाजता त्या दोघींना नातवाच्या ताब्यात देण्यात आले.

कोथरुड पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या किष्किंधानगर पोलीस चौकीत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरव शेळके यांना वयाची साठी ओलांडलेली आजीबाई कडेवर 2 वर्षाची लहान मुलगी घेऊन घाबरलेल्या अवस्थेत फिरत असल्याची निदर्शनास आली. शेळके यांनी त्या आजीला काय झाले विचारले, तेव्हा त्या मला माझे घर सापडत नाही असे म्हणून रडू लागल्या. त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी कौशल्या असे सांगितले गाव-साकुर असे सांगितले. मात्र, कोणता तालुका कोणता जिल्हा काहीही माहिती नव्हते. एवढ्या मोठ्या पुणे शहरात कोठे राहते याबाबत काही सांगता येत नव्हते.

ती आजी त्या लहान मुलीला कडेवर घेऊन दुपारी साडेबारापासून उपाशी पोटी फिरत होती त्यांना खायला दिल्यानंतर लहान मुलगी रडायची थांबली. पुण्यात कोणाकडे सध्या राहते असे विचारले असता नातूकडे राहत असल्याचे सांगितले. मात्र, पत्ता माहीत नव्हता मंदिराजवळ राहत असल्याचे आजीने सांगितले. अशी कितीतरी मंदिरे पुण्यात असतील नक्की कोठे सांगता येत नव्हते. नातू काम काय करतो, यावर गाड्यांच्या दुकानात काम करत असल्याचे आजीने सांगितले.

नाताचे नावही नीट सांगत येत नव्हते. नीट विचारता आजीने सत्या असे नाव सांगितले. मग इथूनच खरा पोलीस तपास सुरू झाला. शेळके यांनी फेसबुक सोशल मीडिया माध्यमाद्वारे सत्या, सतीश नावाचे व्यक्ती शोधायला सुरूवात केली. फेसबुकवरचा प्रत्येक फोटो आजीला दाखवला जात होता. कोणी ओळखीचा आहे का, विचारले जात होते. मग आजीला अचानक एक फोटो दिसला. तो आजीसोबत असलेल्या मुलीचा होता. ते फेसबुक अकाउंट सतीश शिंपले नावाने होते. अकाउंट ओपन केले. त्यात त्याचे फोटो होते. ते फोटो शेळके यांनी लगेच पोलीस स्टेशनच्या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर टाकले. लगेच हद्दीत शोध सुरू झाला. पोलीस शपाई कुंभार यांनी फोटोत शोरुम दिसत आहे. मग तेथून नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला गेला.

फोटोत दिसणाऱ्या टाटा शोरुमवरून कॉन्टॅक्‍ट नंबर मिळवून त्यांना कॉल केले. मात्र, माहिती मिळत नव्हती. दरम्यान, सतीशचे फेसबुक फ्रेंड्‌स यांचे कॉन्टॅक्‍ट नंबर मिळवून घेतले. त्यांच्याकडून सतीशचा नंबर भेटला. शेवाळे यांनी सतीश यांना फोन केला आणि माहिती दिली. त्यानंतर आठ वाजता सतीश कोथरूड पोलीस येथे आला. आजीने जेव्हा सतीशला पाहिले तेव्हा ती व सतीश दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. सतीशला त्याची आजी व मुलगी सुखरूप भेटल्याने त्याने पोलिसांचे आभार मानले. सतीश हा मूळचा बीड जिल्ह्यातील सारनी गावाचा तो पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमाननगरमधील लेन नंबर 2 मध्ये राहतो. सतीश व पत्नी दोघे कामाला जातात. आजी दोन दिवसांसाठी नातवाकडे आली होती. अगदी कमी वेळात आजीला नातू व त्या लहान निरागस 2 वर्षांच्या मुलीला तिचे वडील आधुनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रगत तपास करून पोलिसांनी मिळवून दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेळके यांनी हा तपास केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.