पश्चिम बंगाल – भाजप नेते महादेव सरकार यांच्यावर निवडणुक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील नदियाचे भाजप जिल्हाध्यक्ष महादेव सरकार यांच्यावर निवडणुक आयोगाने आचारसंहितेच उल्लघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत आयोगाने महादेव सरकार यांना येत्या 48 तासाकरिता निवडणुक प्रचार करण्यास बंदी घातली आहे.

ही बंदी शुक्रवार( 26 एप्रिल) सायंकाळी 4 ते रविवार (28 एप्रिल) सांयकाळी 4 वाजेपर्यत असेल. या दरम्यान महादेव सरकार यांना कोणत्याही प्रचार सभेत, रोड शो तसेच रॅलीत सहभागी होता येणार नाही. तसेच त्यांना माध्यमात मुलाखत ही देता येणार नाही.

दरम्यान, भाजप नेते महादेव सरकार यांनी 22 एप्रिल रोजी एका महाविद्यालयातील कार्यक्रमा दरम्यान टीएमसीच्या महुआ मोइत्रा यांच्यावर खाजगी आयुष्यावरून वादग्रस्त विधान केलं होत. त्यानंतर महुआ मोइत्रा यांनी त्यांच्याविरूध्द तक्रार केली होती. याची दखल घेत आयोगाने आचारसंहितेच उल्लघंन केल्याप्रकरणी महादेव सरकार यांना नोटीस पाठविली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.