नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात अडीच कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे म्हंटले आहे.

नरेंद्र मोदी यांची जंगम संपत्ती १.४१ कोटी रुपये असून, १.१० कोटी रुपयांची स्थावर संपत्ती असल्याचे म्हंटले आहे. तर गांधीनगर मधील एका सदनिकेत नरेंद्र मोदी यांची २५ टक्के मालकी आहे. आणि ३८ हजार रुपये त्यांच्याकडे रोख रक्कम असल्याचे या प्रतिज्ञा पत्रात म्हंटले आहे.

वाराणसीतून नरेंद्र मोदी यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्यासहीत एनडीएतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.