नांदूर -दौंड तालुक्यातील डुबेवाडी येथील वयोवृद्ध महिलेला करोना विषाणूची बाधा झाली असल्याची माहिती राहू आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन पांढरे यांनी दिली.
डुबेवाडी येथील 85 वर्षीय वयोवृद्ध महिलेला दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने राहू येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता त्या महिलेची तपासणी करण्यात आली. या महिलेचा अहवाल प्राप्त झाला असून ती महिला पॉझिटिव्ह आली आहे.
त्या महिलेच्या कुटुंबातील विवाह सोहळा (दि.30) जून रोजी पार पडला असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. त्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींचे नमुने आज तपासणीसाठी घेण्यात आले असून त्याचे अहवाल उद्या प्राप्त होणार आहेत.
राहू बेट परिसरातील पानवली व राहू येथील रुग्ण पॉझिटिव्ह असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबातील वयोवृद्ध व लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. पांढरे यांनी केले आहे.