एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा करोनाची लागणी; आता रक्षा खडसेही पॉझिटिव्ह

जळगाव – राज्यात करोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून करोना काळातील नियम आणखी कडक करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या दुसऱ्या लाटेत आता राजकीय नेत्यांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना तिसऱ्यांदा करोनाची लागण झाली असून त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांचा अहवाल देखील करोना पॉजिटिव्ह आला आहे.

खडसेंना या आधी दोनवेळा करोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा करोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सूनबाईक खासदार रक्षा खडसे यांना देखील करोनाची लागण झाल्याची माहिती आज दुपारच्या सुमारास समोर आली.


‘माझी करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो, असं एकनाथ खडसे ट्विटरवर म्हणाले आहेत.


एकनाथ खडसे यांना सर्वात आधी 19 नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती.


दरम्यान 31 डिसेंबर रोजी पुन्हा खडसे यांना करोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रसिद्धीपत्रकही जारी केलं होतं. विशेष म्हणजे या कालावधीत त्यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, करोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी ईडीकडून तारीख वाढवण्याची मागणी केली होती. ती मागणी ईडीने मान्यही केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.