मोहाली – आयपीएलच्या यंदाच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव येत्या गुरुवारी चेन्नईत होणार आहे. येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या नावात बदल केला असून आता हा संघ पंजाब किंग्ज या नावाने ओळखला जाणार आहे.
अमिरातीत झालेल्या आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमात पंजाब संघाची कामगिरी फार चांगली झाली नव्हती. त्यांना गुणतालिकेतही सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाचा पराभव झाला होता. पण त्यानंतर एका पाठोपाठ एक विजय मिळत त्यांनी क्वालिफायरमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आले नाही.