दुर्दैवी! एकाच चितेवर पती-पत्नीचे करावे लागले अंत्यसंस्कार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

sidhi bus accident – मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यात मंगळवारी (ता. 16) बस तलावात कोसळल्याने भीषण अपघात झाला होता. आतापर्यंत या दुर्घटनेत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून त्या दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आलीय. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती अजय पनिका (वय-25), पत्नी तपस्या (वय-23) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तपस्या यांचा सतना येथे एएनएम चा पेपर होता. यासाठी ते सीधीहून सतना येथे जात होते. याचवेळी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच सगळ्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

Image result for sidhi bus accident

अजय आणि तपस्या यांचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तपस्याला शिक्षण देऊन तिला काहितरी बनवण्याची इच्छा होती, त्यासाठीच ते दोघे पेपर देण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला आणि दोघांचा दुर्दैवी अंत झाला. बस तलावात कोसळली होती. तपस्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी 3 वाजता तर अजयचा मृतदेह 5 वाजता सापडला होता. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह रात्री 10 वाजता रूग्णवाहिकेतून गावात पोहोचले. या दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अजयचे वडील गुजरातमध्ये असल्याने त्यांना अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आले नाही.

Image result for sidhi bus accident

दरम्यान, अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृत्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रूपये तर राज्य सरकारने 5 लाख रूपयांची आर्थिक मदत जाही केली आहे. तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Image result for sidhi bus accident

बलेन्दु विश्वकर्मा असे बसचालकाचे नाव असून बुधवारी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला रामपुर नैकिन येथील कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.