नवी दिल्ली – मल्टी-लेव्हल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ऍमवे इंडिया या प्रख्यात कंपनीवर ईडी म्हणजेच सक्त वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करून कंपनीची 757 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉंडरिंग विरोधी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आली आहे.
या कंपनीची तामिळनाडूमधील दिंडीगुल जिल्ह्यातील जमीन आणि कारखाना इमारत, प्लांट, मशिनरी, वाहने, बॅंक खाती आणि मुदत ठेवी हे सारे जप्त करण्यात आले आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग कायद्यांतर्गत जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 757.77 कोटी इतकी आहे.
या जप्त मालमत्तेपैकी 411.83 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे तर उर्वरित 345.94 कोटी रुपयांची रक्कम बॅंकांमधील ठेवींच्या स्वरूपातील आहे. या कंपनीने उत्पादनांच्या किंमतीच्या बाबतीत ग्राहकांची फसवणूक केल्याची ईडीची तक्रार आहे.