पॉंडीचेरीत आणखी 1 वर्ष राष्ट्रपतींची राजवट
नवी दिल्ली, दि. 26 – पॉंडीचेरीतील राष्ट्रपती राजवटीची मुदत एक वर्षाने वाढविण्यात आली आहे. आज राष्ट्रपतींनी तसा एक आदेश काढला आहे.
प्राचीन बौद्ध विहाराचा शोध
विलासपूर – येथून 25 किमी अंतरावरील मलहार या गावी उत्खननात एक बौद्ध विहार सापडण्याची शक्यता असून तो इतका जुना आहे की 7व्या शतकात चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग याने येथे भेट दिल्याचे सबळ पुरावे आढळले आहेत.
पंडित नेहरूंच्या ग्रंथाचे रशियनमध्ये भाषांतर
मॉस्को – 1930-33 या काळात जवाहरलाल नेहरू ब्रिटिश बंदीखान्यात असताना त्यांनी आपली मुलगी इंदिरांच्या (आता भारताच्या पंतप्रधान) शिक्षणासाठी जागतिक इतिहासाचा परामर्श घेणारी पत्रे लिहिली. इंग्रजी भाषेत हा ग्रंथ “ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ (जगाच्या इतिहासाचे दर्शन) या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथाचा रशियन भाषेत तीन खंडी अनुवाद आता मॉस्कोच्या प्रगती प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. रशियन अनुवादाला आर. ए. उल्यानोवक्सी या विख्यात भारताभ्यासीने प्रस्तावना लिहिली आहे.