मुंबई – मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या यांच्या विरोधातील याचिका सक्तवसुली संचलनालयाने मागे घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामिल झालेले नेते भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या मुद्यांवरुन छगन भुजबळ करत असलेल्या वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत.
अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या काही आठवड्यांपासून छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध शाब्दिक युद्ध लढत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाच्या बाजून ठाम भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर त्यासाठी त्यांनी ओबीसी समाजाच्या सभा देखील घेतल्या आहेत.