पुणे – महापालिकेकडून येत्या गुरुवारी (दि.18 मार्च) लष्कर जलकेंद्र आणि भामा-आसखेड जलकेंद्राच्या ठिकाणी स्थापत्य आणि पंपिंग विषयक तातडीची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
त्यामुळे या दोन्ही जलकेंद्राकडून शहराच्या पूर्व तसेच पूर्वोत्तर भागाचा होणारा पाणीपुरवठा सदरच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी (शुक्रवारी) पुरवठा सुरळीत करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र भाग : हडपसर, महमंदवाडी, काळेपडळ, मुंढवा, नगररस्ता, कल्याणीनगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी आणि परिसर.
भामा आसखेड जलकेंद्र : लोहगाव, धानोरी, विमाननगर आणि परिसर.