पुणे – समजा तुमचा एखादा छोटेखानी उद्योग आहे आणि त्याचा सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात तुम्हाला तुमचा ऑनलाइन प्रेझेंस दाखवायचा आहे तर सरळ आणि सोप्या पद्धतीच्या, कुठल्याही थर्ड पार्टी नसलेल्या आणि अगदी कमी खर्चात उपलब्ध असणाऱ्या नो-कोडचा वापर करून तुम्ही तुमची वेबसाईट बनवू शकता. पेमेंट गेटवे बनवू शकता यात सुरक्षिततेचा कुठलाही धोका नाही. यातून तुमचा ऑनलाइन प्रेझेंन्सदेखील दिसेल आणि आपोआप व्यवसाय भरारीला तुम्ही सिद्ध व्हाल. त्यामुळे नो – कोडला आवर्जुन प्राधान्य द्या.
तसेच भविष्यात ई-कॉमर्सला अजिबात कुठला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला रेझर-पेच्या प्रॉडक्ट मॅनेजर अदिती कोठारी यांनी दिला.”जीतो कनेक्ट – 2022′ या आंतरराष्ट्रीय परिषदेत नो कोड वेबसाइट अँड ई-कॉमर्स या विषयावर कोठारी बोलत होत्या. कोठारी म्हणाल्या की, नो-कोड विषयी काही चुकीच्या धारणा असतील तर त्या सोडून द्या. कारण यातून तुमची सिक्युरिटी सहजा-सहजी कधीच कॉम्प्रमाइज होऊ शकत नाही. तसेच समजा नो-कोडचा वापर करून वेबसाइट बनवली, पण एसईओ (सर्च इंजिन ऑफ्टीमायझेशन) वर काम करायचं आहे
तर इंटरनेटवर काही रेफरन्स मटेरियल आहे त्याचा वापर करा. वेबसाइट आपोआप सर्च इंजिनवर लवकर दिसेल. त्यामुळे “एसईओ’च्या बाबतीत जास्त विचार करू नका, असेही त्या म्हणाल्या. तसेच रेझर-पेच्या भविष्यकालीन प्रवासाविषयी देखील त्यांनी भाष्य केले आणि प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना अगदी समर्पक आणि सोप्या भाषेत उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला गौरव मंडोटा यांनी आदिती कोठारी यांचा प्रेक्षकांना परिचय करून दिला आणि गौरव मंडलेचा यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल बंडापल्ले यांनी केले.