मुंबई – दसरा मेळाव्यावरून सुरु झालेल्या राजकारणावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार.” असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटल आहे. ‘शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतो आहोत, मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही’ अशी माहिती देताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर दडपशाहीचे आरोप केले आहेत.
दरम्यान, राज्यात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे निर्माण झाले आहेत. शिवसेनेच्या चिन्हावरूनही दोन्ही गटात वाद सुरु आहे. हे प्रकरण न्यायलयात आहे. मात्र आता वर्षांनुवर्षे सुरु असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा याबाबत सध्या राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. (Dussehra gathering belongs to Shiv Sena and will remain Shiv Sena – Aaditya Thackeray)