अकलूज – खंडाळी-दत्तनगर (ता. माळशिरस) येथाल दत्तनगर – चौंडेश्वरवाडी या दोन किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी माळशिरस तालुका भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस विनोद थिटे यांनी मगराचे निमगाव (ता. माळशिरस) येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरयांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान खासदार निधीतून हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार निंबाळकर यांनी दिली. यावेळी खासदारांनी दत्तनगर गावाविषयी माझे विशेष नाते असल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे सह सहप्रभारी के. के. पाटील, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, किरण पाटील, अमर मगर, मिनानाथ मगर, मारुती मगर, संदेश नरळे, आबा पवार, रणजीत जगताप, प्रदीप ढाणे, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.