वाघोली – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची निवड झाली असून या माध्यमातून आमदार अशोक पवार हे शासनाच्या योजना बँकेच्या मार्फत सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संचालकपदी आमदार अशोक पवार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी सातव पाटील बोलत होते.
गावोगावच्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यरत असून बँकेच्या संचालक पदी नव्याने नियुक्त झालेले आमदार अशोक पवार हे अनुभव संपन्न व तज्ञ संचालक असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहे.