मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या अतरंगी ड्रेसमुळे अनेकदा ट्रोल होते. बहुदा उर्फीला याची सवय झालेली असावी. सध्या उर्फी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी दुबईमध्ये आहे. दुबईत देखील उर्फी आपल्या अतरंगी अंदाजात वावरताना दिसते. परंतु हाच अंदाज आता उर्फीला चांगलाच महागात पडताना दिसत आहे. दुबई पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.
उर्फी जावेद मनाला वाटेल त्या स्टाईलमध्ये फॅशनच्या नावाखाली अतरंगी कपडे परिधान करताना दिसून येते. दुबईमध्ये देखील उर्फीने असेच काहीतरी केल्याचे समोर आले. एका मनोरंजन वेब साईटने दिलेल्या माहितीनुसार उर्फीने परिधान केलेल्या अतरंगी ड्रेसमुळे दुबईमधील काही स्थानिक रहिवाश्यांनी तेथील पोलिसांत तिची तक्रार दिल्याचे समजते.
भारता व्यतिरिक्त इतर देशांमध्ये महिलांनी कसे कपडे घालावेत याबाबत काही नियम ठरवून दिलेले आहेत. उर्फीने अतरंगी पोशाखात एक व्हिडीओ शूट केला होता ज्यामुळे दुबईतील नागरिकाने तिच्याविरोधात तक्रार दिल्याचे समजते. दुबई पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी उर्फीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती एका मनोरंजन साईटने दिली आहे.उर्फीला आपल्या अतरंगी स्टाईलमुळे थेट विदेशात देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.