मुंबई – आज उर्फी जावेद सोशल मीडियाचा एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. उर्फी जावेद नेहमीच रंगीबेरंगी कपड्यांमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चर्चेत असते. उर्फीलाही तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.अनेकजण तिच्यावर टीका देखील करतात. यापैकी एक नाव म्हणजे फैजान अन्सारी. फैजान अनेकदा उर्फीच्या विरोधात बोलताना दिसला आहे. मात्र, यावेळी फैजलने उर्फीबाबत वक्तव्य करून सर्वांना धक्का दिला आहे.
फैजान अन्सारीने उर्फी जावेदला ट्रान्सजेंडर म्हटले आहे. तसेच हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे आहेत आणि लवकरच तो स्वत: न्यायालयात ते सिद्ध करेल असा दावाही अभिनेत्याने यावेळी केल्याचे समजते.
नुकतेच माध्यमांशी संवाद साधताना अन्सारी म्हणाला, ‘माझ्याकडे पुरावे आहेत ज्याच्या आधारे मी देशासमोर मोठा खुलासा करणार आहे. उर्फी जावेद ही मुलगी नाही, ती किन्नर आहे. माझा तिच्याशी आधीच बराच वाद आहे, आता ते काय आहेत ते मी पुरावे, साक्षीदार आणि किन्नर समाजाच्या प्रमुखांसोबत हायकोर्टातच सिद्ध करणार आहे असं फैजान म्हणाला.
मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांचे सत्य लवकरात लवकर लोकांसमोर यावे आणि तिने किन्नर समाजात सामील व्हावे, अशी माझी इच्छा आहे. फैजान अन्सारीचा हा खुलासा ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याबाबत उर्फी जावेदची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उर्फी यावर काय भाष्य करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.