मुंबई – शाहरुखच्या पठाण चित्रपटाचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. पठाणने दमदार कमाई करत बड्या बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत कमाईच्या बाबतीत आठशे कोटींचा टप्पा गाठला आहे. अशात पठाणच्या दुसऱ्या भागाची देखील चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या उर्फी जावेदने शाहरुखबाबत एक विधान केल्याने ती चांगलीच कॅचर्चेत आली आहे.
मॉडेल उर्फी जावेद चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. कपडे असतो वा एखादी ऍक्टिव्हिटी उर्फी प्रत्येक वेळी चर्चेत राहण्यासाठी काहीना काही करतच असते. नुकतंच उर्फीने थेट शाहरुखला उद्देशून एक विधान केलं आहे ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पठाणच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु असताना उर्फी म्हणते,’मी पठाण २ साठी अव्हेलेबल आहे तेहि फक्त शाहरुख खानसाठी’.
View this post on Instagram
उर्फीच्या इंटरव्हिवमधील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीय. ज्यामध्ये पठाण सुपरहिट झालाय आणि पठाणच्या सिक्वलची सध्या चर्चा सुरु आहे असं सवाल उर्फीला विचारण्यात आला त्यावर ती म्हणते, ‘मी फक्त शाहरुख खानसाठी ही फिल्म करेल, मी पठाण 2 साठी अव्हेलेबल आहे. असं उर्फी यावेळी बोलताना दिसते.