मुंबई – सध्या ‘कांतारा’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. कन्नड इंडस्ट्रीतील हा चित्रपट चर्चेत येण्याची कारण देखील तशीच आहे.साऊथमध्ये या चित्रपटाने छप्परतोड कमाई केल्यानंतर आता हिंदीमध्ये देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. बोलीवूडच्या भल्या भल्या बिग बजेट चित्रपटांना जे जमलं नाही ते कांताराने कस काय करून दाखवलं याचा प्रश्न सर्वांना पडला आहे.
ट्रेलरवरूनच कांतारा हा चित्रपट काहीतरी वेगळंच घेऊन येणार हे स्पष्ट झालं होत. अवघे १६ कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने देशभरात १०० हुन अधिक कोटींची कमाई नेमकी कशी केली असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यासोबतच खरंच वेळ आणि पैसे खर्च करून हा चित्रपट का पाहावा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
नव्या संस्कृतीचा नवा विषय
आजवर सिनेमांमध्ये विविध ठिकाणच्या कला संस्कृती तुम्ही पाहिल्या असतील, परंतु कर्नाटकातील एका छोट्या गावातील एका वस्तीवरील एक गोष्ट आहे. अफाट निसर्ग सौंदर्य,रूढी,परंपरा त्यासोबतच राजांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत चालत आलेला जुना काळ या वेळी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. साधी कथेची मांडणी परंतु कधीही न ऐकलेला आणि न पाहिलेला विषय या चित्रपटातून मांडण्यात आला आहे, गरीब साध्य परंतु मेहनती लोकांची गोष्ट प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटते.
गरजेपुरतच व्हीएफएक्स आणि दमदार ऍक्शन
व्हीएफएक्सचा भडीमार न करता गरजेपुरता वापर आणि कथेला अनुसरून दिलेली इफेक्ट यामुळे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहताना खरंच मजा येते. त्यासोबतच दमदार ऍक्शन देखील या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. यामुळेच कदाचित साऊथमध्ये या चित्रपटाला भरगोस यश मिळताना दिसत आहे.
थरारक म्युजिक
मूळ कन्नड असूनही हा चित्रपट हिंदीमध्ये डबा करण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाचे पार्श्व संगीत अर्थात बॅग्राऊंड अँबियन्स इतका जबरदस्त आहे की स्क्रिनवरून तुमची नजर हटणार नाही. यामुळे प्रेक्षक स्टार्ट टू अँड पडद्यावर खिळून राहतो.
वेगळी पात्र आणि वेगळे लोकेशन
या चित्रपटात सर्व नावीन्यपूर्ण गोष्टी आहेत. कथेपासून ते पात्रांपर्यंत सर्व काही नवीन असल्यामुळे या आधी मोठ्या स्क्रिनवर न दिसलेल्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात. चित्रपट चित्रित करण्यात आलेली जंगल आणि निसर्ग दाखवणारे लोकेशन पाहताना खरंच खूप मजा येते. जंगले,नदी जुनी घर या सर्व गोष्टी प्रेक्षकांना सहजतेने आपल्याशा करतात.