मुंबई – कन्नड अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा’ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर असाक्षरशः राज्य केले. भारतासह जगभरात कांताराने जबरदस्त कमाई केली.हा चित्रपट 2022 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. ‘कांतारा’ चित्रपटाने अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला देशभरात रातोरात स्टार बनवले. अनेक दिग्गज नेत्यांनी या चित्रपटाची दखल घेत ऋषभ शेट्टीला शुभेच्छा देखील दिल्या. आता पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यश,ऋषभ शेट्टी,विजय किरागांडूर अशा अनेक कलाकारांशी यावेळी पंतप्रधानांनी भेट घेत संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी कन्नड सिने सृष्टीबाबत देखील कलाकारांशी चर्चा केली.
“ही माझ्यासाठी स्वप्नं पूर्ण होण्यासारखी गोष्ट असलयाचे ऋषभने यावेळी म्हंटले. कन्नड सिनेसृष्टीत काय काय सुरु आहे आणि आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबाबत पंतप्रधानांशी बोलणं झाल्याचे देखील शेट्टी यांनी सांगितले. बऱ्याचदा त्यांच्याकडून ‘कांतारा’ हा शब्द ऐकून मलाही खूप बरं वाटलं अशा भावना अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने व्यक्त केल्या.
Inspiring meeting PM @narendramodi ಅವರು as we discussed role of Entertainment industry in shaping New India and Progressive Karnataka. Proud to contribute towards #BuildingABetterIndia 🇮🇳 Your visionary leadership inspires us & your encouragement means the world to us @PMOIndia pic.twitter.com/M95vv2cJk2
— Rishab Shetty (@shetty_rishab) February 13, 2023
कांतारा 2 येणार
कांतारा 2’ 2024 साली प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ऋषभने सांगितले होते की, ‘कांतारा 2’ हा सिक्वेल नसून प्रीक्वल असेल कारण या भागात चित्रपटाची कथा खूप वर्षांपूर्वीची असणार आहे. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांताराने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.