Kantara 2 : साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) ‘कांतारा 2’ (Kantara 2) बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. कांतारा २ ची पहिली झलक प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. याबाबत निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. यावेळी निर्मात्यांनी फस्ट लूकची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग म्हणजेच ”कांतारा’ सप्टेंबर 2022 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त झाला.(kantara chapter 1)
आता अभिनेता कांतारा 2 शूटिंगकडे वाटचाल करत आहे. पहिल्या भागापेक्षा तो मोठा असेल असे सांगितले जात आहे. बजेटपासून त्याचे शूट मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. इतकंच नाही तर ‘कंतारा 2’ मध्ये काही नवीन कलाकारही दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.आसात निर्मात्यांनी पहिल्या झलकची घोषणा केली आहे. (Kantara 2 full movie)
कांताराच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केली आहे.कांतारा चित्रपटाचा दुसरा भाग हा या चित्रपटाचा प्रीक्वल असल्यामुळे याला कांतारा चॅप्टर 1 (Kantara Chapter 1) असे नाव देण्यात आले आहे. ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२५ वाजता प्रदर्शित होणार आहे. फोटो शेअर करताना, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘भूतकाळातील पवित्र प्रतिध्वनींमध्ये पाऊल ठेवा, जिथे प्रत्येक फ्रेमशी देवत्व जोडलेले आहे. अदृश्याची झलक मिळवण्यासाठी कनेक्ट रहा. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ಇದು ಬರಿ ಬೆಳಕಲ್ಲ ,ದರ್ಶನ, Revealing the first look on 27th nov @ 12:25pm @hombalefilms @VKiragandur @ChaluveG pic.twitter.com/HEvj27yeQU
— Rishab Shetty (@shetty_rishab) November 25, 2023
27 नोव्हेंबरला मुहूर्त पूजेने ‘कांतारा चॅप्टर 1’चे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटासाठी एक भव्य आणि विस्तृत सेट तयार करण्यात आला आहे, जेथे अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, निर्माता विजय किरगांडूर आणि उर्वरित कलाकार आणि क्रू उपस्थित असतील. मुहूर्त पूजेनंतर, निर्माते डिसेंबरमध्ये मुख्य शूटला सुरुवात करतील, उर्वरित कलाकारांची देखील लवकरच घोषणा केली जाईल.