श्रीनगर – जम्मू काश्मीरला पहिली महिला बसचालक मिळाली असून तिचे नाव आहे पूजा देवी. पाच वर्षांपासून आवड म्हणून ड्रायव्हिंग करण्यास सुरुवात केलेल्या पूजा देवीचे मोठी गाडी चालविण्याचे स्वप्न होते. बुधवारी तिचे हे स्वप्न सत्यात उतरले.
पूजा देवी बसोहलीचा सांदर गावातील स्थानिक आहे. सुरुवातीला पूजा देवीचे कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिक तिच्या ड्रायव्हिंगच्या विरोधात होते. परंतु, आज त्याच पूजाने सर्वांना गौरान्वित केले आहे.
जम्मू ते कठुआ आणि कठुआ ते जम्मू बसचे स्टेअरिंग पूजाच्या हातात होते. तिला पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले होते. परंतु, पूजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. पुजाने अन्य महिलांनाही वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निश्चय केला आहे. याआधीही पूजाने जम्मू ते कठुआ ट्रकही चालवला आहे.
जम्मू ते कठुआ बस युनियनच्या महाव्यवस्थापक रछपाल सिंह यांनी म्हंटले कि, दोन दिवसांआधी पूजाने त्यांच्याकडे बस चालवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तिच्याकडे जड वाहतुकीचे लायन्सनं तसेच तिने याआधी ट्रक चालवला असल्याने कोणतीच अडचण नव्हती.
पूजा म्हणाली कि, लहानपणीचे स्वप्न आता पूर्ण झाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. यासाठी मी खूप संघर्ष केला आहे. पती आणि कुटुंबियांच्या विरोधात जाऊन हे स्वप्न पूर्ण केले आहे. अन्य महिलांनाही वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण होण्याची आशा तर नाही. कारण कोणीही मोठे स्वप्न नाही. दरम्यान, स्वतःच्या कष्टाच्या कमाईत नक्कीच आनंद असतो आणि तो मी अनुभवत आहे, असे त्यांनी सांगितले.