पाटणा – येथून दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये जेडीयू आमदार आणि प्रवासांमध्ये चांगलाच वाद झाल्याची घटना घडली आहे. जेडीयू आमदार गोपाल मंडल हे ट्रेन मध्ये अंतर्वस्त्रात (अंडरवेअर आणि बनियानवर) टॉयलेटला गेले होते.
ते टॉयलेटवरून सीटकडे येतांना त्यांच्यावर प्रवाशांनी आक्षेप घेतला. यावेळी मंडल यांनी प्रवाशांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आता गोपाल मंडल यांच्यावर एका प्रवाशाने दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे. अंतर्वस्त्रात (अंडरवेअर, बनियानवर) फिरणाऱ्या या आमदारावर आक्षेप घेताना प्रवाशाने आपली सोन्याची अंगठी हिसकावून घेतली, असा आरोपही केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात दिल्ली येथील सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात आमदार गोपाल मंडल यांच्याविरोधात सहप्रवासी प्रल्हाद पासवान यांनी तक्रार दाखल केली आहे. तत्पूर्वी, या घटनेमुळे चालत्या ट्रेनमध्ये चांगलाच गोंधळ झाला. सध्या या घटनेचा विडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.