जेजुरी-जेजुरी नजीक कोळविहिरे गावच्या हद्दीत राख-घाटेवाडी रस्त्यावर एसटी बस न थांबवल्याच्या कारणावरुन बसला दुचाकी आडवी लावून दगडाने काचा फोडत एका अल्पवयीन मुलाने चालकास मारहाण केली आहे, ही घटना सोमवारी (दि. 9) सायंकाळी साडेचार वाजम्याच्या दरम्यान घडली. याबाबत अण्णासाहेब बाजीराव रणवरे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित अल्पवयीन युवकावर सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आण्णासाहेब रणवरे हे एसटी बस क्र. (एमएच 12 इएफ 6339) कोळविहिरे गावाकडून राख गावाकडे नेत असताना कोळविहिरे गावच्या अल्पवयीन युवकाने बसला आपली दुचाकी क्र. (एमएच 12 एसए 7677) आडवी मारत बसवर दगड मारून काचा फोडल्या तर फिर्यादी रणवरे यांना थांव म्हणत असताना तू गाडी का थांबवली नाही असा जाब विचारत मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पुढील तपास करीत आहेत.