पुणे – हॅनीट्रॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधात तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) शासकीय गुपिते अधिनियम 1923 कलम 3, 4 आणि 5 नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश एस.बी.कचरे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एटीएस पुणे युनिट पथकाने कारवाई करत दि. 5 मे रोजी डॉ. कुरूलकर यांना अटक केली होती.
त्यानंतर पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी दिली. एटीएस या प्रकरणाचा आणखी तपास करायचा आहे. त्यासाठी पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणीच्या मागणी करण्याची मागणी केली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. ऋषिकेश गानू काम पाहत आहेत.