सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी (दि. 3) सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रयत शिक्षण संस्थेची बैठक व विभागीय मातंग परिषदेस ते उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता ते सातारा येथे येणार असून 11 वाजता रयतच्या मुख्यालयात ते बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 ते 1.45 या वेळेत ते शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत.
कोंडवे येथील अनंतराज मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी 2 वाजता होणाऱ्या विभागीय मातंग परिषदेस ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3.30 वाजता ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या दौऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नियोजन करण्यात आले असून शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खलबते होण्याची शक्यता आहे.