पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या विरूध्द पुणे पोलिसांना ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्या विरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी 5 जानेवारी रोजी संबंधीत विभागाच्या सक्षम प्राधिकरण अधिकार्याकडे त्याबाबत परवानगी मागितली आहे. पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलामुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यापूर्वी ललित पाटील प्रकरणात ससून मधील वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर देवकाते यांना ललित पाटीलची शिफारस केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू आहे. पाटील प्रकरणाचा तपास सुरू आहे की बंद झाला आहे, हे समजत नाही.
चौकशीच्या समितीच्या अहवालात ससूनचे तत्कालिन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर दोषी आढळले. पोलिसांनी डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी त्यांना सहआरोपी केली नाही.
डॉ. ठाकूर यांना याप्रकरणात अटक व्हायला हवी. ललितला मदत करणार्या कारागृहातील अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धांगेकर यांनी केली होती.