Jaipur Pink Panthers vs Telugu Titans, Pro Kabaddi League :- प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत जयपुर पिंक पॅंथर्स संघाने तेलगु टायटन्स संघावर 38-35 अशी अवघ्या 3 गुणांनी थरारक मात केली. या विजयाच्या जोरावर जयपुर संघाने यंदाच्या स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली आहे.
अपने होम लेग में जयपुर के पैंथर्स का प्रचंड आग़ाज़ 🔥
कांटे की टक्कर में तेलुगु टाइटन्स को हराकर दर्ज की 7वीं जीत 🩷#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvTT pic.twitter.com/KwY3VqhWpl
— ProKabaddi (@ProKabaddi) January 12, 2024
जयपुर संघाच्या विजयात स्टार खेळाडू अर्जुन देशवाल याने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात पहिल्या सत्रापासून जयपुर पिंक पॅंथर्सने प्रत्येक क्षणाला वर्चस्व राखले. त्यांच्या अर्जुन देशवाल या स्टार खेळाडूने अपर्तिम पकडी केल्या, तसेच सातत्याने यशस्वी चढाया करताना रेड गुणांसह एकूण ११ गुणांची कमाई केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर जयपुर संघाने पहिल्याच सत्रात २७-८ अशी भक्कम आघाडी घेतली.
जयपुरने १३ रेड गुण कमावले. तसेच टॅकलचे ७ तर सर्वबादचे ४ गुण मिळवले. त्यामुळे पहिले सत्र जयपुरच्याच वर्चास्वाने गाजले. या उलट तेलगु जायंट्स संघाला केवळ ८ गुणांचीच कमाई करता आली. त्यांचा स्टार खेळाडू पवन शेरावतने ४ गुणांची कमाई केली मात्र, त्याला दर्जानुसार खेळ करता आला नाही.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर तेलगु संघाने थोडी जिद्दी खेळी करत जयपुरवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फारकाळ टीकला नाही. दरम्यान जयपुरने आपली आघाडी ३१-१५ अशी वाढवली होती. मात्र, त्याचवेळी जयपुरच्या खेळाडूंकडून सातत्याने चुका झाल्या व त्याचा लाभ घेत पवनने चांगलीच बाजी मारली.
Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : भारताच्या ‘रिदम सांगवान’नेही मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
त्याच्या या कामगिरीच्या जोरावर तेलगु संघाने तुल्यबळ लढत देत या सामन्यात ३१-३७ अशी स्थिती निर्माण केली. त्याना केवळ ६ गुणांची पिछाडी भरून काढायची होती. हा सामना अखेरच्या मिनिटापर्यंत थरारक स्थितीत आला होता. मात्र, तेलगु संघाच्या खेळाडूंना जयपुरचे वर्चस्व मोडून काढता आले नाही व सामना गमवावा लागला.