नगर -आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलास मारहाण करत सिगारेटचे चटके दिल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले डॉ. अनिल बोरगे, शंकर मिसाळसह चौघेही संशयित आरोपी बेपत्ता आहेत.
प्रशासनानेच तसा अहवाल महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासमोर ठेवल्याने आयुक्त मायकलवर यांनी डॉ. बोरगे व मिसाळ यांच्याकडील पदभार आज तातडीने काढून घेतला.
आरोग्याधिकारी अनिल बोरगे याच्याकडील करोनाविषयक कामाची जबाबदारी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. राजूरकर आता “नोडल अधिकारी’ म्हणून काम पाहतील. तसेच या अगोदरच्या असलेल्या कामाची जबाबदारी डॉ. राजूरकर यांच्याकडेच राहील.
मिसाळ याच्याकडे अग्निशमन विभाग प्रमुखपदासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम होते. दोन्हींचा पदभार आता उपअभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बल्लाळ यांच्याकडील विद्युत विभागाची जबाबदारी उपअभियंता आर. जी. मेहत्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अगोदरची जबाबदारी सांभाळून मेहेत्रे यांना विद्युत विभागाचे काम पाहावे लागणार आहे.
अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून आरोग्याधिकारी बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख मिसाळ व कर्मचारी बाळू घाटविसावे तसेच आरोग्य विभागात नर्स म्हणून काम करणारी “त्या’ अल्पवयीन मुलाची आई कर्तव्यावर हजर झालेली नसल्याची माहिती