नांदेड : बाऱ्हाळी ता. मुखेड येथील संत श्री कैकाडी महाराज प्राथामिक शाळेचे संस्थापक अर्जुनराव निवळीकर यांचे सुपुत्र डॉ. बालाजी निवळीकर यांनी नुकतीच मानसशास्त्र विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन केली. यानिमित्त शाळेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. बालाजी निवळीकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित केले. ‘योग ध्यानधारणा व प्रार्थना आरोग्य व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी सर्वांना गरजेचे आहे.’ यावेळी सूत्रसंचलन विलास निवळीकर यांनी केले. सहशिक्षक सन्मुख महाडीवाले यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत अस्वले, अशोक निवळीकर, शेख जमिल, दिलीप पाटील, इसाक मरसंगे, मोहंमद पठाण, मोहंमद एजाज, संगीता दापकेकर, निला पवार, पार्वती वाडीकर यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.