करंजविहिरे आरोग्य केंद्र विभागात डझनभर बाधित

शिंदे वासुली  -चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील करंजविहीरे (ता. खेड) प्राथमिक आरोग्य केंद्र विभागात बुधवारी (दि. 8) 12 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य केंद्राचे डॉ. मक्‍सूद शेख यांनी दिली. यात वासुली 1, शेलू 1, आंबेठाण 1, येलवाडी 1, निघोजे 4, मोई 1, नाणेकरवाडी 1, मेदनकरवाडी 2 असे 12 बाधित आढळून आले आहेत.

वासुली येथील एक कामगार बाधित आढळल्याने तो राहात असलेली व शेजारील इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून प्रतिबंधित केले आहे. तर त्याची पत्नी व एक वर्षाच्या मुलाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना 28 दिवस होम क्‍वारंटाइन होण्याच्या सूचना दिल्याचे वराळेचे डॉ. हरिदास टेकवडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.