राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत 22 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या तर 19 जणांनी करोनावर विजय मिळवला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यात दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. तालुक्यातील जवळपास 40 गावांसह राजगुरूनगर,आळंदी आणि चाकण 259 व्यक्ती आतापर्यंत करोनाबाधित आहेत.
दरम्यान, महाळुंगे इंगळे येथील कोव्हिड केअर सेंटरमधून करोनावर मात केलेल्या 19 जणांना घरी सोडताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून गुलाबपुष्प देण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, भगवान पोखरकर, कोव्हीड केअर सेंटरमधील डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते.