लंडन – इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आपल्या पुस्तकात धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने केलेल्या संथ फलंदाजीवर पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी संशय व्यक्त केल्याचा उल्लेख स्टोक्सने केला आहे.
उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना खेळावा लागू नये यासाठी धोनीने या सामन्यात संथ फलंदाजी केली. हा सामना केवळ धोनीमुळेच भारतीय संघाला गमवावा लागल्याचा आरोप पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी केला होता. धोनी सामना जिंकण्यासाठी खेळत आहे. असे वाटतच नव्हते असेही पाकच्या खेळाडूंचे मत होते, असेही स्टोक्सने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.