मुंबई – राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील 24 तासांत 279 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता 5 हजार 454 वर पोहचली आहे. सध्या 1 हजार 78 पोलिसांवर उपचार सुरू असुन, आतापर्यंत करोनामुळे 70 पोलिसांचा राज्यात मृत्यू झाला आहे.
दरम्यान, करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.