मुथूट फायनान्सवरील दरोड्यातील वाहने जप्त

नाशिक – नाशिकमधील मुथूट फायनान्सवर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपींची वाहने नाशिक-गुजरात मार्गावर रामशेज किल्ल्याजवळ डोंगराच्या पायथ्याशी पोलिसांना सापडली आहेत.पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. या दरोड्यावेळी लुटू करताना केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता.

याप्रकणरी पोलिसांनी तीन पल्सर बाईक जप्त केल्या आहेत. काही स्थानिकांनी शुक्रवारी दुपारपासून तीन बाईक तिथे उभ्या असल्याची माहिती पोलिसांना आज सकाळी दिली. त्यानंतर काही वेळातच तीन पोलीस उपायुक्तांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

या बाईकचे चेसी नंबर गायब असल्याचे तपासा उघडकीस आले आहे. वाहन सोडून दरोडेखोरांनी पळ काढला असून त्यांना लवकरच गजाआड करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आरोपिंचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, नाशिकच्या उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्समध्ये शुक्रवारी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडला होता. रिव्हॉल्वरसह आलेल्या दरोडेखोरांनी अडवणूक करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या होत्या. यात कर्मचारी संजू सॅम्युअल यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर कैलास जैन आणि राजू देशपांडे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वत: घटनास्थळी भेट देत तपास हाती घेतला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×