- दोन अर्ज वैध
- लोकशाही पद्धतीने होणार निवड
पिंपरी – पिंपरी–चिंचवड शहराध्यक्षपदाकरिता यंदा प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे. त्याकरिता कुणाल वाव्हळकर आणि स्वप्निल कांबळे या दोन उमेदवारांचे अर्ज छानणी प्रक्रियेत वैध ठरले आहेत. तसेच अर्ज माघाऱी घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने ही निवडणूक दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 10 ऑक्टोबरला त्याकरिता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
रिपाइंच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्याकरिता जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असुन. 50 सदस्यांची समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या निवडणुकीकरिता रिपाइंच्या 2500 सभासदांची नोंदणी करण्यात आली असून, ते या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शहराध्यक्ष पदाकरिता इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये कुणाल वाव्हळकर आणि स्वप्निल कांबळे यांचे प्रत्येकी एक अर्ज समितीला प्राप्त झाले. छाननी प्रक्रियेत हे दोन्ही अर्ज वैध ठरले. मात्र माघारी घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
अर्ज छाननीच्या वेळी प्रभारी सूर्यकांत वाघमारे, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत उपस्थित होते.