महापालिकेने खरेदी केले 50 इंजेक्शन्स
पुणे – अत्यवस्थ करोनाबाधितांसाठी महापालिकेने “टॉसिलीझुमॅब’ या औषधाची खरेदी केली आहे. सध्या 50 इंजेक्शन्स घेण्यात आले आहेत. ससून रुग्णालयातील बाधितांना ती मोफत दिली जाणार आहेत.
करोनाचा प्रसार रोखणे तसेच शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तैनात केला आहे. या तज्ज्ञांनी बाधितांवरील उपचारांचा अभ्यास करून काही शिफारसी केल्या आहेत, त्यामध्ये “टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शनचे 2 डोस बाधितांना दिल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यावर या इंजेक्शनमुळे मृत्युदर कमी होण्याला मदत होणार असल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.