पाकिस्तानच्या सैन्य मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील एका बाजारात शुक्रवारी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेत. ही जागा पाकिस्तानच्या लष्कराच्या मुख्यालयाजवळ आहे. हा बॉम्बस्फोट शहरातील सदर बाजार या परिसरात झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ते सजिदुल हसन यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार स्फोटके एका वीजेच्या खांबाजवळ ठेवण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपत्तीचे नुकसान झाले आहे.  तसेच घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले होते. या घटनेत जखमी झालेल्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसरही सील करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली.

दरम्यान, तपास  पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅब घटनास्थळी तपास करत असल्याची माहितीही पोलीस प्रवक्त्यांनी दिली. हा स्फोट दहशतवादी संघटनांनी केला असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  आतापर्यंत कोणीही या स्फोटाची जबाबदारी घेतली नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.