मुंबई – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही त्यांचे सौंदर्य तरुणींना लाजवले असे आहे. मात्र सध्या एका वेगळ्याच कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी अभिनेत्री कविता मेढेकर यांना ‘आमच्या सुनेला जास्त त्रास देऊ नको बरं का! नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा!?’ असा गंमतीत इशारा दिला आहे.
त्याचं झालं असं की, मृणाल कुलकर्णी यांची सून अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सूनेची भूमिका करत आहे. यात तिच्या सासूची भूमिका कविता मेढेकर करत आहे. यात भुवनेश्वरी नावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कविता मेढेकर कडक सासूबाई दाखवल्या आहेत. यावरून मृणाल कुलकर्णी यांनी गंमतीत एका पोस्टमधून कविता मेढेकर यांना सक्त ताकीद दिली आहे.
मृणाल कुलकर्णी आणि कविता मेढेकर यांचा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्या सुनेला जास्त त्रास देऊ नको बरं का!! नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा!?’ या मालिकेच्या प्रमोशननिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी ही गंमतीशीर पोस्ट लिहिली आहे. यावर अनेक जण ‘मस्तच’, ‘दोघीही सुंदर आहेत’ अशी कमेंट करत आहे. यात शिवानीची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही सासू एकत्र आल्या आहेत].
दरम्यान, अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी मागील वर्षी 3 मे रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा!?’ या मालिकेत काम करत आहे. तर विराजस दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.