मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सौंदर्याने लाखो मनांवर राज्य करते. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. नुकतीच दिशा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचली होती. भारतासह विदेशात देखील दिशांचे फॅनफॉलोविंग मोठे आहे. हे दुबईत गेलेल्या दिशेने दाखवून दिले. यावेळी दिशाची दुबईमध्ये देखील क्रेझ असल्याचे दिसून आले.
दुबईमध्ये असूनही दिशाभोवती चाहत्यांचा मोठा गराडा केला होता. दिशा आपल्या जन्म दिवसानिमित्त दुबईला गेली होती. यावेळी चाहत्यांना ही बाब समजताच अनेकांनी तिच्या हॉटेलबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. दिशा बाहेर पडताच चाहत्यांनी तिला घेरले यावेळी अनेकांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा देखील प्रयत्न केला.
दिशेने देखील गर्दीतून वाट कढत चाहत्यांना हात दाखवला. यावरूनच दिशांची दुबईमध्ये देखील क्रेझ असल्याचे पाहायला मिळाले. यावेळेसचा दिशांना चाहत्यांमधून वाट काढतानाच व्हिडीओ देखील समोर आला आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटवर, दिशा अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्यासोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये शेवटची दिसली होती. ती लवकरच करण जोहरच्या ‘योद्धा’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. दिशाने सुर्यासोबत तिचा पहिला तामिळ चित्रपट ‘कंगुवा’ही साइन केला आहे. याशिवाय ती प्रभास स्टारर ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटातही दिसणार आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष दिशासाठी बॉलिवूड पेक्षाही साऊथ चित्रपटांचे असणार आहे.