राजगुरूनगर – खेड तालुक्यात तंबाखू पुडी डॉलरचा उच्चांक मोडण्याच्या स्थितीत आहे. तंबाखू शौकिनांमध्ये लॉकडाऊनच्या काळात पुडी मिळविण्याची कसरत सुरु झाली असून ती मिळाली तर आपण मोठी कामगिरी केल्याच्या समाधान त्यांना मिळत आहे.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे आरोग्यास अपायकारक असले तरी तंबाखू खाणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे पान स्टॉल बंद आहेत. तरी काही किराणा दुकानात तंबाखू मिळत होती; मात्र आता तिचा मोठा तुडवडा भासत आहे.
ज्यांच्याकडू आहे ती काळ्याबाजाराने मिळत आहे. लॉकडाऊन पूर्वी तंबाखूच्या एक पुडीला दहा रुपये दर होता, ता आता 60 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यातच दारू बंद असल्याने तंबाखू शौकिनांची तळमळ होत आहे. काळ्या बाजाराने तंबाखू, गुटखा विक्री होत आहे त्याला मोठा भाव मिळत आहे.