पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाच्या वतीने हमीद दलवाई यांच्या जीवनावरील ‘हमीद : द अनसंग ह्युमानिस्ट’ हा माहितीपट दाखवण्यात आला तसेच या माहितीपटाच्या दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांच्याशी संवाद साधण्यात आला.
यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, प्राध्यापक श्रीरंजन आवटे उपस्थित होते. विद्यार्थी मंथन कार्यक्रमांतर्गत दर आठवड्याला एका कार्यक्रमाचे आयोजन करतात, यावेळी या माहितीपटाचे आयोजन केले होते.
दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांच्याशी श्रीरंजन आवटे यांनी साधलेल्या संवादातून हमीद दलवाई यांचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून केलेले कार्य उलघडत गेले तसेच विद्यार्थ्यांनी देखील माहितीपटाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-विष्णू नाझरकर,
कॉलेज रिपोर्टर
राज्यशास्त्र विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ