नोएडा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर 28 मध्ये वरूण विहार एन्क्लेव्ह येथे करोना हॉटस्पॉट जाहीर केला आहे. त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या डॉक्टरांना केंद्र सरकारचे आदेश असूनही सोसायटी बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
या सोसायटीत डॉ नितीन घोंगे आणि डॉ. संचिता दुबे हे अपोलो रुग्णलयात कार्यरत असणारे डॉक्टर राहतात. त्यांना पोलिसांनी बाहेर जाण्यास मानाई केल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.