वाधवान कुटुंबाला प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले.

विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र मिळाले. त्यामुळे सामान्यांना एक नाही आणि श्रीमंत धेंडांना, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.