हडपसर (पुणे)– हडपसर येथील प्रसिध्द व्यावसायिक बाळासाहेब राऊत यांना तामिळनाडू येथील ग्लोबल ह्यूमन पीस या विद्यापीठाने
डॉक्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. पेय उद्योगात विक्री आणि विपणन या विषयामध्ये बाळासाहेब राऊत यांनी विशेष अभ्यास केला आहे.
येथील विविध संस्थेच्या माध्यमातून राऊत सामाजिक कार्य करीत आहेत. अनेक गरजूंना कोणताही गाजावाजा न करता मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. अनेक विशेष रुग्णांना मदत करत सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत.