Actress Mithali Mayekar – अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मिताली अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मिताली तिच्या बोल्ड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मिताली नुकतीच विदेशात फिरायला गेली. अशात तिने काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर इनस्टाग्रामवर शेअर केलेत. मात्र या फोटोमधील तिचा अंदाज अनेकांना आवडलेले नाही. यावरून आता तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशाच तिच्या एका फोटोवर नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे. फोटोवरची कमेंट पाहून मितालीने संबंधित ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे.
सध्या तिचे बाली ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. बालीच्या समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून तिने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत. या हॉट लुकने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर काहींना तिचा हा रुचलेला नाही. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांने कमेंट करत लिहिले की,’नागडं(नग्न) झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?” असा विचित्र प्रश्न विचारल्यावर मितालीने यावर, “माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करून” असं सडेतोड उत्तर दिलं आहे. मितालीने दिलेल्या उत्तराचं तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुक केलं जात आहे.
तत्पूर्वी देखील मितालीने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. त्यामुळे देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर आता तिने बिकिनीतील फोटो शेअर केल्याने काही जण तिच्यावर टीका करत आहेत. मात्र त्याआधीच तिने ‘ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका’ असे म्हणत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.