मुंबई : मोबाईल फोन स्लो चार्ज होण्याच्या समस्येने अनेकदा आपण सगळेच त्रस्त असतो. कधी-कधी लोकांना फोन चार्जिंगला लावून तासनतास थांबावे लागते. अशा परिस्थितीत आपला बराच वेळ वाया जातो. आज आम्ही तुम्हाला असे काही सोपे टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल फोन जलद चार्ज करू शकता. चला त्या उपायांबद्दल जाणून घेऊया –
*ओरिजनल चार्जर वापरा
तुमचा फोन पटकन चार्ज करण्यासाठी तुम्ही नेहमी त्याचा ओरिजनल चार्जरच वापरा. अनेकदा असे दिसून येते की जेव्हा आपण फोनमध्ये दुसरा चार्जर वापरतो, अशा स्थितीत फोन स्लो चार्ज होतो. या कारणास्तव, फोन जलद चार्ज करण्यासाठी नेहमी मूळ चार्जर वापरा. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरीही दीर्घकाळ टिकते.
* फ्लाईट मोड चालू करा
जर तुम्हीही फोनच्या स्लो चार्जिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर फोन चार्ज करताना तुम्ही तुमच्या फोनचा फ्लाईट किंवा एरोप्लेन मोड चालू करा. एरोप्लेन मोड ऑन केल्यानंतर फोन जलद चार्ज होतो.
* ब्लूटूथ, जीपीएस आणि वायफाय बंद करा
जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन फास्ट चार्ज करायचा असेल, तर तुम्ही फोन चार्ज करण्याआधी ब्लूटूथ, जीपीएस आणि वायफाय बंद करा. असे केल्याने फोन अधिक वेगाने चार्ज होतो.
* चार्जिंग करताना तुमचा फोन वापरू नका
तुमचा फोन चार्ज होत असताना फोन वापरू नका. म्हणजेच कुणाला कॉल करू नका अथवा मॅसेज करू नका. असे केल्याने मोबाईल स्लो चार्ज होतो.
* चार्ज करताना फोन बंद करा
जर तुमचा फोन खूप हळू चार्ज होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा फोन बंद करून (स्विच ऑफ) चार्जला ठेवा. असे केल्याने फोन जलद चार्ज होतो. वर नमूद केलेल्या उपायांनंतरही तुमचा फोन जलद चार्ज होत नसेल, तर तुमच्या फोनचा जॅक किंवा चार्जर खराब असण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमचा फोन आणि चार्जर दाखवा.