दिवसभर काम करून घरी आल्यानंतर थकवा जाणवणे साहजिकच आहे. पण घरातच असल्यावरही थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. कारण शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास त्याचा परिणाम शरीरावर जाणवतो आणि थकवा येतो.
थकव्यामुळे दिवसभर सुस्ती जाणवते. कामात मन लागत नाही. थकवा आला की झोप येतेच. अशावेळी संपूर्ण दिवस सुस्तीत आणि झोपेत जातो. तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही.
यासाठी व्हिटॅमिन डी शरीराला आवश्यक आहे. सकाळच्या कोवळ्या ऊन्हापासून हे जीवनसत्त्व सहज आपल्या शरीराला मिळते. त्यामुळे सकाळी झोपेतून लवकर उठून सूर्यकिरणे अंगावर झेलत सूर्यादयाचा आनंद घ्या आणि निरोगी राहा.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजाराला निमंत्रण मिळते. व्हिटॅमिन डी शरीराची हाडे निरोगी ठेवतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या लक्षणांपैकी एक म्हणजे नैराश्य.
जे लोक दिवसभर घरी बसून काम करतात त्यापेक्षा घराबाहेर काम करणाऱ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळी उन्हात उभे राहून व्हिटॅमिन डी घ्या आणि फ्रेश व्हा.