स्पेन – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याच्यावर नियमभंग करून सराव केल्याप्रकरणी कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. करोनामुळे लॉकडाऊन आहे तरीही त्याने कोर्टवर उतरून सराव केल्याने त्याच्यावर टीका होत आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत स्पेनचा दुसरा क्रमांक आहे. त्यामुळे जेव्हा हा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाले तेव्हापासून देशात लॉकडाऊन लावला गोला आहे. नारगिक एकत्र येतील किंवा जमावबंदीचे उल्लंघन होईल असे काहीही करण्यावर बंदी आहे. मात्र, जोकोवीचने एकट्याने टोनिस कोर्टवर उतरून सराव केला. तसेच लॉकडाऊनच्या नियमांचेही पालन केले नाही.
देशात खेळाडूंना वैयक्तिक सराव करण्याची परवानगी असली तरीही संकेत म्हणून खेळाडू सराव करण्यासाठी जाण्याचे टाळत आहेत. मात्र, जोकोवीचने कोर्टवर उतरून नियमभंग केला आहे त्यामुळे येत्या काळात त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे.
केवळ इतकेच नाही तर त्याने या सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्याच्यावर खूप टीका होत आहे. देशात करोनामुळे 25 हजारांपेक्षाही जास्त बळी गेले आहेत. अशातच अद्याप हा धोका संपुष्टातही आलेला नाही मग जोकोवीच सारखा एक जबाबदार खेळाडू असे कसे वर्तन करू शकतो अशा शब्दात चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.