नवी दिल्ली – दिव्यांचा सण दिवाळी जवळ आली आहे. आजकाल श्रीनगरच्या (Shrinagar) निशात भागातील मोहम्मद उमर (वय 27) (Mohammad Umar) हे देखील पणत्या अर्थात मातीचे दिवे बनवण्यात व्यस्त आहेत. मोहम्मदच्या घरातील बहुतांश सदस्यही विविध रंगांनी पणत्या सजवण्यासाठी मदत करत आहेत. यावेळी आपण 20 हजार पणत्या बनवणार असल्याचे उमर सांगतात. त्यामुळे श्रीनगर परिसरातील दिवाळीला (Diwali celebration) मोहम्मद उमरने साकारलेल्या पणत्यांचा प्रकाश आसमंत उजळेल. (Mohammad Umar making lamp)
मोहम्मद उमर हा एक वाणिज्य पदवीधर आहे. गेली अनेक वर्षे नोकरी न मिळाल्याने त्याने आपले परंपरागत कुंभारकाम 6 वर्षांहून अधिक काळ आपला व्यवसाय म्हणून स्वीकारले. त्याने वर्ष 2021 मध्ये सुमारे 1200 पणत्या तयार केल्या.
उमरला 20,000 पणत्या बनवण्याची पहिली मोठी ऑर्डर 2022 मध्ये आली. त्याला त्यावेळी मातीच्या तुटवड्यामुळे 15 हजार पणत्या तयार करता आल्या. आता यावेळी दिवाळीसाठी 20 हजाराहून अधिक दिवे बनवण्याचा निश्चय त्याने केला आहे. (jammu and kashmir)
उमर सांगतो की, जम्मूच्या एका घाऊक विक्रेत्याने 5000 पणत्यांची ऑर्डरही दिली आहे. श्रीनगर व्यतिरिक्त जम्मू आणि आसपासच्या भागातही या दिव्यांना मागणी आहे. हिंदू बांधव आपल्या सणांमध्ये आपण बनवलेले दिवे वापरतात याचा आपल्याला आनंद होतो. दिवाळीसाठी दिवे बनवल्याने हृदयाला शांती मिळते, असे तो मानतो. विशेष म्हणजे, उमरचे कुटुंब 40 वर्षांपासून मातीची भांडी बनवत आहे.